रत्नागिरी:- शहरानजीकच्या परटवणे येथे चालत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.त्यामुळे त्याचा ट्रकवरील ताबा सूूटून तो रस्त्याच्या कडेला कलंडला.ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वा.सुमारास घडली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
अब्दुल गनी मुर्तुझा पठाण (मुरुगवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.गुरुवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील ट्रक (एम-डब्ल्यू-टी-9146) घेउन हातखंब्याच्या दिशेने जात होता.तेव्हा त्याला हदयविकाराचा झटका आल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सूटला आणि तो रस्त्याच्या कडेला कलंडून अपघात झाला.तेथील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने ट्रकच्या दिशेने धाव घेतली तेव्हा त्यांना चालक बेशुध्द अवस्थेत दिसून आला.त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.