धनादेश अनादर प्रकरणी एक निर्दोष

खेड:- धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल केलेल्या दोन तक्रारींची सुनावणी झाली असता एकाची दापोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता केली. ॲड. सिद्धेश संजय बुटाला यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

गणेश महादेव घोले यांनी श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे किरण गांधी यांच्याविरोधात धनादेश न वटल्याप्रकरणी दापोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची सुनावणी झाली असता दोन्ही तक्रारीमधून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.