धनंजय कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधीक्षकपदी बढती

गृह विभागाकडून पुन्हा रत्नागिरीत नियुक्ती

रत्नागिरी:- जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची वरिष्ठ पोलीस अधिक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणूनच ते पुढे कार्यरत राहणार आहेत.त्यामुळे त्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ऑक्टोबर 2022 रोजी रत्नागिरीला नियुक्ती झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसह बारासू येथील रिफायनरीचा प्रश्नांसह जिल्हयाच्या सुरक्षा आणि सामाजिक सलोखा याकडे त्यांनी विशेष लक्ष देऊन काम केल्याने अनेक गुन्ह्याची सहज उकल झाली आहे. बुधवारी संध्याकाळी श्री कुलकर्णी यांच्या पदोन्नतीची बातमी रत्नागिरीत येताच सर्वानी त्यांचे अभिनंदन केले. श्री. कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधीक्षक म्हणून बढती झाली आहे. तसे आदेश निघाले असून पदोन्नतीने त्यांची नियुक्ती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. या पदोन्नतीबद्दल श्री कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.