रत्नागिरी:-कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना सोमवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्यासाठी धक्कादायक बातमी समोर आली. तालुक्यात तब्बल 20 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत 37 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यात रत्नागिरी तालुक्यातील 20, कामथे येथील 17 रुग्ण आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1299 इतकी झाली आहे.
उपचारादरम्यान साक्री नाटे तालुका रत्नागिरी येथील एका 67 वर्षीय रुग्णाचा काल मृत्यू झाला त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे यामुळे मृत्यूची संख्या आता 42 झाली आहे.