द्वितीय क्रमांक पटकावलेल्या ‘मी तर बुवा अर्धा शहाणा’ नाट्य मंडळाच्या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप

रत्नागिरी:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी तालुका आयोजित नटश्रेष्ठ कै. रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत वरवडे येथील मी तर बुवा अर्धा शहाणा या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या यशाचे पंचक्रोशीसह सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी तालुका आयोजित नटश्रेष्ठ कै. रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धेमध्ये ह.भ.प. वै. शरद दादा बोरकर यांच्या आश्रया खालील आणि नूतन बाल मित्र बोरकर नाट्य मंडळ वरवडे या कलाकारांनी साकारलेल्या मी तर बुवा अर्धा शहाणा या नाटकाचा तालुक्यातील तब्बल ४७ नाटका मधून आपल्या विभागातील मंडळाने या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक पटकावल्याची बातमी समजताच भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे तसेच त्यांच्या सोबत रत्नागिरी दक्षिण भाजपा तालुका अध्यक्ष दादा दळी साहेब यांनी कार्यक्रम ठिकाणी येऊन संपूर्ण मंडळाचे आणि नाट्य कलाकारांचे पुष्पगुच्च देऊन अभिनंदन केले. तसेच सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या मंडळाला या पुढे नाटक क्षेत्रात येणाऱ्या अडचणीमध्ये आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन देखील दिले. तालुक्यातील वरवडे येथील मंडळाने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर पंचक्रोशीसह सर्व परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.