दोन पादचारी महिलांना मोटारसायकलची धडक

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एसएमएस हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असलेल्या दोन पादचारी एक महिला व युवतीला अज्ञात मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघी जखमी झाल्या.

वैशाली तुषार राऊत (वय २१, भरणे), प्रतीक्षा प्रल्हाद खडके (वय १४, भरणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने दोन्ही जखमींना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोटरसायकलस्वार घटनास्थळावरून पसार झाला असून, खेड पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.