दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्या साडेचारशे पार; नव्याने 281 कोरोनाग्रस्त

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना बुधरी बाधित रुग्णसंख्येचा आकडा तीनशे समीप पोहोचला. नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 281 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 801 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यँत 77 हजार 19 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.85 टक्के आहे. नव्याने 281 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 80 हजार 357 इतकी झाली आहे. 381 बाधित रुग्णामध्ये रत्नागिरी तालुक्यात 56 रुग्ण सापडले आहेत. चिपळूण 82, खेड 42 रुग्ण सापडले आहेत. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 629 तर संस्थात्मक विलगीकरणात 172 रुग्ण उपचार घेत आहेत.