देवूड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील चाटवळवाडी-देवूड येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल गणपत कळंबटे (वय ४४, रा. करबुडे, मुळगाववाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास देऊड चाटवळवाडी फाटा येथील चिरेखाणीचे सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अनिल कळंबटे यांच्याकडे मद्यपानाचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रिया सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.