देवरुख तुळसणीतील 25 वर्षीय तरुण कोल्हापूरातील धरणात बुडाला

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील तरुण कोल्हापूर येथील धरणात बुडाल्याची घटना 2 जून रोजी शुक्रवारी सकाळी घडली. या बुडालेल्या तरूणाचा अद्याप थांगपत्ता लागलेला नसून तुषार बेर्डे (25, तुळसणी, बेर्डे वाडी) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, तुषार बेर्डे हा तुळसणी येथील तरुण असून तो आपल्या मित्रांसोबत मुंबई हून गावी फिरण्यासाठी आला होता. मार्लेश्वर, रत्नागिरी अशा ठिकाणी फिरल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शाहूवाडी येथील आंबर्डे या ठिकाणी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता धरणात पोहण्यासाठी उतरले. मात्र धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी अरडाओरडा केला मात्र काहीच उपयोग झाला नाही. तो पर्यंत तो दिसेनासा झाला होता.