देवरुख:- शहरातील कुंभ्याचा दंड येथील रहिवासी तीर्था दिनेश दामुष्टे या ८ वर्षीय बालिकेचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दामुष्टे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तीर्था ही देवरुख जि.प. शाळा क्रमांक ४. मध्ये दुसऱ्या इयत्तेत होती. अचानक ताप ‘आल्याने तिच्यावर देवरुख येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तीर्था हिचे निधन झाले. तीर्था ही हुशार, प्रेमळ, मनमिळावू हरहुन्नरी होती. तिच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मनसेचे देवरुख उपशहराध्यक्ष दिनेश दामुष्टे यांची ती कन्या होत. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.