दुर्धर आजाराने ग्रस्त मुलांचा रंगला आनंद मेळा

मंत्री सामंतांच्या वाढदिवसाला नियोजन ; तुषार साळवींचा पुढाकार

रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवासेनेचे रत्नागिरी तालुका प्रमुख तुषार साळवी यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्धर आजारानेग्रस्त असलेल्या मुलांसाठी निवळी येथे आनंद मेळा आयोजित करण्यात आला होता. मौज, मजा-मस्ती करत मुलांचा दिवस सहजच निघुन गेला. सायंकाळी घरी परतत असताना त्याच्या चेहर्‍यावर समाधान झळकत होते.
जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात विविध ठिकाणी राहणारे बालदोस्तांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी आयोजकांना निमित्त हवे होते. यासाठी गुरुप्रसाद संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन पाटील, संगमेश्‍वर लायन्सचे सदस्य अमोल पाटणे यांचे विशेष प्रयत्न सुरु होते. युवासेनेचे तुषार साळवी यांच्याशी संपर्क झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मेळा भरवण्याचा आगळावेगळा उपक्रम घेण्याचा निर्णय झाला. चर्चेनंतर ठिकाण निश्‍चित करून आनंद मेळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुलांना एकत्र आणण्यात आले. शुक्रवारी (ता. 22) निवळी येथे जिल्ह्यातील 60 मुले त्यांच्या पालकांसह सहभागी झाली होती. त्यांच्यासाठी युवासेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी विशेष नियोजन केले होते. त्यांनी अभिजित दुड्ये, अभी घोडके, संजय नाईक, प्रशांत चाळके आणि सर्व पदाधिकार्‍यांसह मुले आणि पालकांची निवळी येथे भेट घेतली. या वेळी मुले-पालकांनी वॉटर पार्क मधील रेनडान्स, वॉटर स्लाईड आणि अन्य सर्व खेळांचा मनमुराद आनंद लुटला. हे खेळ खेळत असताना त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाची झलक पहायला मिळाली. दुपारी जेवणानंतर कार्यक्रमाची सांगता करतानाच मुलांनी आणि पालकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांना धन्यवाद दिली. तसेच निवळी येथील वॉटरपार्क चालकांचेही सर्वांनी आभार मानले. याप्रसंगी मनोगतामध्ये दैनदिन जीवनात येणार्‍या अडचणी मांडल्या होत्या. त्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातूून सोडविण्याचे आश्‍वासन युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी दिले. तसेच भविष्यात हा उपक्रम दरवर्षी करण्यात येईल असेही सांगितले.


कोट

पालकमंत्री उदय सामंत हे लोकनेता आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा विचार होता. त्यामधूनच दुर्धर आजारानेग्रस्त मुलांना आनंद मेळा घेण्याचा निर्णय झाला. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मुलांच्या चेहर्‍यावर आनंद झळकावा अशीच इच्छा होती. ती या निमित्ताने पुर्ण झाली.

  • तुषार साळवी, तालुकाप्रमुख, युवासेना