दुबार मतदान करणाऱ्यांना बसणार चाप 

रत्नागिरी:- राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी ५ जानेवारी २०२३ रोजी मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदार यादीत दुबार आलेली नावे आणि दुबार फोटो असलेल्या मतदारांची नावे शोधण्यात आली असून यामुळे दुबार मतदान करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात असे ७१ दुबार मतदार आढळले. बीएलओंच्या माध्यमातून ही नावे कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकच मतदार दोन ठिकाणी मतदान करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.