दुपदरीकारणाच्या कामासाठी 10 ऑक्टोबरला मेगाब्लॉक; कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम 

रत्नागिरी:- दक्षिण रेल्वे मार्गावर मंडगाव जक्शनला जोडणारा दुपदरी मार्गाच्या कामासाठी १० ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम काही कोकण रेल्वेच्या गाड्यावर होणार आहे. त्या दिवशी आठ गाड्या रद्द करण्यात आल्या असून एक गाडी मडगावपर्यंत धावणार आहे.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण वेगाने सुरु होत आहे. त्यापुढे दक्षिण रेल्वे मार्गावरही दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. संवोर्देम-चांडोर गोवा-मडगाव जंक्शन हा मार्ग दुपदरीकरणाने जोडला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून मडगाव जंक्शनपर्यंतच काम १० ऑक्टोबरला केले जाणार आहे. त्यासाठी मडगावच्यापुढे संवोर्देमकडे जाणार्‍या काही गाड्या रदृद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रद्द करण्यात येणार्‍या गाड्यांमध्ये ७ व ८ ऑक्टोबरला धावणारी तिरुपती-हैद्राबाद वास्को द गामा एक्स्प्रेस, ९ ऑक्टोबरला सुटणारी पुणे-एर्नाकुलम, ११ तारखेची एर्नाकुलम-पुणे, १० व ११ ची रत्नागिरी-मडगाव आणि ९ व १० ची मडगाव रत्नागिरी विशेष गाडी, १० ऑक्टोबरची मंगळूर-मडगाव आणि त्याच दिवशी धावणारी मडगाव-मंगळूर या गाड्यांचा समावेश आहे. तसेच १० तारखेची मुंबई-मडगाव गाडी करमाळी पर्यंत धावणार आहे.