दुचाकी घसरल्याने स्वाराचा मृत्यू; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- दुचाकी स्लिप होऊन स्वतः च्या मरणास व मागे बसलेल्या तरुणाच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्देश संदिप पर्शुराम (वय २४) असे संशयित मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीकेशवनगर फणसोप सडा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत संदिप पर्शुराम हे दुचाकी (क्र. एमएच-०१ डीएफ ३५२४) च्या पाठीमागे मित्र वैभव रधुनाथ पवार (वय ३०) यास दुचाकीवरुन फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात असताना फणसोपसडा येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून रस्त्यात उभ्या असलेल्या जनावरांमुळे दुचाकीला ब्रेक केला असता दुचाकी स्लिप झाली. या अपघातात मित्र वैभव पवार यास किरकोळ दुखापत झाली. मात्र स्वार संदिप पर्शुराम याच्या डोक्याला व शरिराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रविण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.