रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना मंगळवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा.सुमारास जयगड ते खंडाळा जाणार्या बायपास रोडवर घडली.
नयन संतोश साळवी (29,रा.पाली,रत्नागिरी) असे स्वतःच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या चालकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी तो आपल्या ताब्यातील ज्युपिटर (एमएच-08-एव्ही-5661) घेउन जयगड ते खंडाळा असा भरधाव वेगाने जात होता.तो बायपास रोडवर आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सूटला आणि रस्त्याच्यास डाव्या बाजुला असलेल्या सिमेंटच्या कठ्यावर आदळून तो गाडीसह नाल्यात पडला.यात गंभिर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ढेरे करत आहेत.