खेड:- लोटे औद्योगिक क्षेत्रातील लोटे चिरणी- आंबडसमार्गे चिपळूण मार्गावरील आंबडसनजीक दुचाकीस धडक देऊन झालेल्या अपघातात कुणाल किशोर जाधव याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार किशोर जाधव हा आपल्या सहकाऱ्यासमवेत दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या बोलेरो कारने धडक दिली . या अपघातात कुणाल जाधव याचा मृत्यू झाला तर गणेश भालेराव हा जखमी झाला . अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले . दुचाकीस्वाराच्या मृत्यूसह एकास , जखमी केल्याप्रकरणी अज्ञात बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.