दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा

खेड:- खेड-दापोली मार्गावरील फुरुसनजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संतोष हनुमंत शेडगे (३८, उतरोली- पुणे) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकच्या धडकेने सचिन गणू खामकर (४२, फुरूस-भुलेश्वरवाडी) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्याची मुलगी स्वरुपा ही गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले होते. संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोकोही केला होता. अपघाताबाबत पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत पलायन केलेल्या ट्रक चालकाचा शोध सुरू केला होता.