दुचाकीवरुन कर्नाटक येथे जाणाऱ्या स्वाराचा अपघाती मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीहून कर्नाटक राज्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या स्वाराचा चिकोडी रस्त्यावर अपघात झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

रवी शिवाजी राठोड (वय ३०, रा. मुरुगवाडा- झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना १७ जुलैला दुपारी अडीचच्या सुमारास चिकोडी रस्त्यावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवी राठोड हा गुरुवारी १७ जुलैला दुपारी रत्नागिरीहून दुचाकी (एमएच-०८ एड्ब्ल्यू ३६१२) घेऊन मुचकंडीतोडा बागलकोट राज्य-कर्नाटक) असे जात असताना चिकोडी रस्त्यावर दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटून पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तेथील नागरिकांनी शासकीय रुग्णालय बेळगाव येथे दाखल केले होते. त्यानंतर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी (ता. २९) सकाळी आठच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयात पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.