दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस जाणार्‍यार रस्त्यावरील कुर्ली फाट्याच्या पुढे ओव्हरटेक करताना एसटीची दुचाकीला धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघानाही दुखापत होऊन ते जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वा. घडली. याप्रकरणी एसटी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निसार ईब्राहिम काद्री (61, रा.शिवखोल राजीवडा, रत्नागिरी) हे शनिवारी सकाळी पल्या ताब्यातील अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (एमएच -08-एएल- 1048) वर पाठीमागे त्यांचा मावस भाउ हुसेनमियाँ शेखहसन पोमेंडकर (65, रा.मजगाव, रत्नागिरी) यांना बसवून पावस ते रत्नागिरी असे जात होते. ते कुर्ली फाट्यापुढे आले असता पाठीमागून येणाऱ्या एसटी (एमएच -20-बीएल- 0533) चा चालक जोतीबा रामू पेडणकर (32, रा.ढेकोळीवाडी, कोल्हापूर) याने दुचाकीला ओव्हरटेक केले. यावेळी दुचाकीच्या हॅन्डलला एसटीची धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांनाही दुखापत झाली. मात्र अपघात झाल्यानंतर एसटी चालक अपघाताची खबर न देता निघून गेला होता. या प्रकरणी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.