दिवाळीत एसटीला २४ लाखांचे उत्पन्न

रत्नागिरी:- दिवाळी सुट्टीच्या हंगामात रत्नागिरी एसटी विभागातून 322 फेर्‍या सोडण्यात आल्या होत्या आल्या होत्या. या फेर्‍यांमधून महामंडळाला तब्बल 23 लाख 98 हजार 484 चे उत्पन्न मिळाले आहे.

गणेशोत्सव उत्पन्नानंतर रत्नागिरी विभागाला दिवाळी सुट्टी हंगामातूनही चांगला नफा मिळाला आहे. दिवाळी सुट्टीच्या हंगामात एसटी विभागाने उत्तम नियोजन केले होते. परिणामी उत्पन्नही चांगले मिळाले. सर्वाधिक फेर्‍या या दापोली आगारातून 75 फेर्‍या सोडण्यात आले होत्या. या आगारातून 5 लाख 34 हजार 130 रुपये इतके सर्वाधिक उत्पन्न मिळाले असल्याचे एसटीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.