दिलासादायक; जिल्ह्यात 24 तासात 140 पाॅझिटिव्ह 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण आज खूपच कमी झाले आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात अवघे 140 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 1974 बळी घेतले आहेत.

मागील दोन दिवसात कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला होता. मागील 24 तासात नव्याने 140  रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 69 हजार 694 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 4569 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 196 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 65 हजार 127 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 8 रुग्णांच  बळी गेला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 1974 इतकी आहे. जिल्ह्यात 2593 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.