दिलासादायक; जिल्ह्यात 24 तासात 310 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- नियमित पाचशे कोरोना बाधित सापडत असताना आज जिल्ह्यावासीयांना दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 310 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 190 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 120 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 310 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 27 हजार 271 झाली आहे. आज जिल्ह्यात 11 मृत्यूंची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच होता मात्र आज  310  रुग्ण सापडल्याचे दिलासादायक चित्र आहे. नव्याने आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात 310 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 27 हजार 271 जाऊन पोहचली आहे. सोमवारी आलेल्या अहवालात 190 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 120 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 11 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 815 इतकी आहे. चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.98 % आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे. 

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 310 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 120, दापोली 14, खेड 11, गुहागर 6, चिपळूण 76, संगमेश्वर 30, राजापूर 41 आणि लांजा तालुक्यात 12 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 16.48% आहे.