रत्नागिरी:- तालुक्यातील तारवेवाडी येथे घराच्या शेजारी दारुच्या नशेत पाय घसरुन पडलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात 26 सप्टेंबर रोजी रात्री 10.15 वा.सुमारास मृत्यू झाला.
संजिव बाळकृष्ण तारवे (47,रा.तारवेवाडी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. 25 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा.सुमारास संजिव तारवे राहत्या घराच्या शेजारी दारुच्या नशेत पाय घसरुन पडला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याला प्रथम निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. परंतू संजिवला अधिक त्रास होउ लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान 26 सप्टेंबर रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









