रत्नागिरी:- दाभोळे (ता. संगमेश्वर) येथील अरुंद पुलावर एसटीला ट्रक चालकाने धडक दिली. संशयित ट्रक चालकाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जून मच्छिंद्र काळेल (वय ३५, रा. चोपडी ता. सांगोला, जि. सोलापूर) असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २६) दुपारी दीडच्या सुमारास दाभोळे येथील अरुंद पुलावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसटी वाहक संतोष महादेव संभोजी (वय ३४, रा. एसटी डेपो माळनाका-रत्नागिरी. मुळ ः मुतनाळ, ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) हे व त्यावरिल चालक निलेश गोकुळ जिमकारे हे एसटी (क्र. एमएच-०९ ई.एम ९१८८) घेऊन रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरुन जात असताना दुपारी दीड च्या सुमारास दाभोळे गावातील अरुंद पुलावर आले असता संशयित ट्रक चालक याने ट्रक (क्र. एमएच-०९ बीसी ५१८२) हा निष्काळजीपणे चालवून एसटीच्या उजवेकडील मागील बाजूस धडक दिली व पलायन केले. या प्रकरणी वाहक संतोष संभोजी यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









