दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत १९ जणांची अनामत जप्त

दापोली:-  दापोली नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. दापोली नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. त्यातील १९ उमेदवारांना मिळालेली मते ही त्या प्रभागातील मतमोजणीत वैध ठरलेल्या मतांच्या एक अष्टमांशपेक्षा कमी असल्याने या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना भरलेली निवडणूक अनामत रक्कम जप्त झाली आहे.       

या उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. १ (प्रभूआळी) मधील मनसेचे उमेदवार प्रशांत जाधव, भाजपचे अजय शिंदे, प्रभाग क्र. २ (अहमदनगर) मधील भाजपच्या उमेदवार साधना धाडवे, प्रभाग क्र. ३ (आझादनगर) मधील काँग्रेसचे उमेदवार अब्दुल बसित काझी, भाजपचे स्वरूप महाजन, प्रभाग क्र. ४ (खोंडा) येथील भाजपचे नवाझ तळघरकर, काँग्रेसचे जहीर तळघरकर, प्रभाग क्र. ६ (पोस्टआळी) येथील भाजपच्या वेदा गोरे, प्रभाग क्र. ७ (कोकंबा आळी) येथील मनसेच्या किरण गायकवाड, प्रभाग क्र. ८ (फॅमिली माळ-६) येथील मनसेचे अरविंद पुसाळकर, अपक्ष दिलीप भैरमकर, भाजपचे ऋषिकेश हेदुकर, प्रभाग क्र. ९ (फॅमिली माळ-७) येथील अपक्ष उमेदवार किरण घोरपडे, भाजपचे जितेंद्र महाडिक, प्रभाग क्र. १२ (बुरुड आळी) येथील बसपाच्या उमेदवार विशाखा पवार, भाजपाच्या उमेदवार मृणाली सोंडकर, प्रभाग क्र. १३ (वरची बुरुडआळी) येथील भाजपच्या उमेदवार सान्वी कदम, प्रभाग क्र. १४ (भारतनगर) येथील भाजपचे उमेदवार अतुल गोंदकर, प्रभाग क्र. १५ (नांगरबुडी) येथील काँग्रेसच्या वृषाली कदम यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या निवडणुकीत मनसेने ४ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील ३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे तर भाजपने १६ जागा लढवल्या होत्या. त्यातील १० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.