कोरोना रुग्ण सापडल्याने निर्णय
रत्नागिरी:- येथील जिल्हा परिषद कार्यालयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडू लागल्यामुळे दहा टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 ऑगस्टपर्यंत याची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याचे नियोजन प्रत्येक विभागप्रमुखाने करावे असे आदेश अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
मुख्य प्रशासकीय इमारतीत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. या अनुषंगाने कोविड-19 या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना म्हणून कार्यालयातील उपस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे 17 ते 21 ऑगस्ट या कालावधीत आरोग्य विभाग वगळता सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागात दहा टक्के प्रमाणे कर्मचारी उपस्थित राहील याचे नियोजन करावे, तसेच सर्व कर्मचान्यांसाठी ’वर्क फॉर्म होम’ चा अवलंब करावा. कार्यालयीन कामकाज करण्याची जबाबदारी निश्चित करुन देण्याबाबत आदेश करावते. त्याप्रमाणे कार्यवाही करुन त्याची प्रत सामान्य प्रशासन विभाग विभागाला सादर करावी. संबंधित कर्मचार्यांनी केलेल्या कामकाजाबाबतचा अहवाल सहाय्यक प्रशासन अधिकारी मार्फत तपासून विभाग प्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे 24 ऑगस्टला सादर करावा अशा सुचना दिल्या आहेत.









