रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात देखील दररोज कोरोनाचे नवे नवे रुग्ण सापडत आहेत. रविवारी रात्री प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी शहरात दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील तब्बल सहा रुग्ण हे थिबा पॅलेस परिसरातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील सहा रुग्ण हे थिबा पॅलेस परीसरातील आहेत. तर कुवारबाव येथे नव्याने दोन रुग्ण सापडले आहेत. अरिहंत नगर येथे देखील एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. साटवली लांजा येथील एक, प्रतिभा महिला वसतिगृह येथे दाखल असलेले 2, सिविल ऍडमिट 1 आणि खेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.