रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याचे चित्र असताना गुरुवारी रात्री तालुक्यात तब्बल 32 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. शहरातील थिबा पॅलेस परिसरात एकाच घरातील नऊजण कोरोना बाधित आढळले आहेत. यात चार लहानग्यांचा देखील सामावेश आहे.
तालुक्यात 32 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील नऊ रुग्ण थिबा पॅलेस परिसरात सापडले आहेत. एकाच कुटुंबातील हे रुग्ण आहेत. या नऊ पैकी 1 महिन्याचे, 5 महिने, नऊ महिन्याचे आणि 1 वर्षाच्या लहान मुलांचा समावेश आहे.
याशिवाय तालुक्यात सिविल 1, पोलिस मुख्यालय 1, राजेंद्र नगर 1, मारुती आळी 2, गाडीतळ 1, राधाकृष्ण नगर 2, कारवांची वाडी 1, रायगड 2, राजापूर 1, नाचणे 3, परटवणे 1, मारुती मंदिर 1, जोशी पाळंद 2, खेडशी 2 आणि उद्यमनगर येथे 1 रुग्ण सापडला आहे.