थिबापॅलेस येथून विवाहिता बेपत्ता

रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस येथील विवाहिता घरात औषधे आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती परत आली नाही. या प्रकरणी तिच्या पतीने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली
आहे.

राखीया साहिद शेख (वय ३०, रा. सुरभी अपार्टमेंट, थिबापॅलेस, रत्नागिरी) असे घरातून निघून गेलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास थिबापॅलेस येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राखीया या किरकोळ आजारी होत्या औषधे आणण्यासाठी बाहेर जाते असे सांगून घरातून निघून गेली. ती परत आली नाही. या प्रकरणी राखीया यांचा पती साहिद शेख (वय ३४) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी
शहर पोलिस ठाण्यात विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.