तोल जाऊन समुद्राच्या पाण्यात पडलेल्या खलाश्याचा मृत्यू

रत्नागिरी:- मिरकरवाडा येथे बोटीवरील खलाशी समुद्राच्या पाण्यात तोल जाऊन पडला. शोध घेतला असता तो मिरकरवाडा येथे बेशुद्ध अवस्थेत सापडला. तात्काळ उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

गोपीलाल रामप्रसाद डंगौरा (वय ४३, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी. मुळ ः कैलाली, नेपाळ ) असे मृत खलाश्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) साडेदहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोपीलाल डंगौरा हा खबर देणार यांच्या नुर-ए-महम्मद या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. मिरकरवाडा येथे बोटीवर समुद्राच्या पाण्यात असताना त्याचा तोल जाऊन पाण्यात पडला. त्याचा शोध घेतला असता तो मिरकरवाडा जेटी येथे बेशुद्ध अवस्थेत सापडला. तात्काळ खबर देणार यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.