तुरळ येथे चारचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई गोवा महामार्गावर मराठवाडी फाटा येथे बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वसईवरून गणपतीपुळे कडे जाणाऱ्या ब्रेझा कारचा रस्त्याच्या बाजूला लावलेला गार्डला धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये चालक जागीच ठार झाला.

बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वसई कडून गणपतीपुळेकडे जाणारी ब्रेझा कार (क्रमांक एम एच ०४ जे व्ही ७१९८) कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटुन भीषण अपघात झाला. कार रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लोखंडी गर्डर मध्ये घुसून तो गर्डर चालक सलिम सुलतान खान(वय ४६) रा.वसई यांच्या मांडीमध्ये घुसून चालक गाडीच्या बाहेर फेकला गेला व जागीच गतप्राण झाला.बाजूला बसलेला झोपेत असणारा त्याचा मित्र सुखविंदर संधू (वय ४६) रा मिरारोड हा किरकोळ जखमी झाला अपघाताची खबर मिळताच आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण त्यांचे सहकारी, माजी सभापती कृष्णा हरेकर, बाबू कुंभार हे घटना स्थळी पोहचले तात्काळ या घटनेची खबर पोलिसाना देण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक विवेक साळवी ऱ्याच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींला उपचारासाठी सांगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व मृत चालकाचे शव शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.पुढील तपास सुरू आहे.