तीन उन्हाळी स्पेशल गाड्यांचे आजपासून आरक्षण

रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टी हंगामासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्यां सीएसएमटी-करमाळी, एलटीटी-करमाळीसह एलटीटी-तिरवअनंतपुरम साप्ताहिक उन्हाळी स्पेशल गाड्यांचे २४ मार्चपासून आरक्षण खुले होणार आहे.

सीएसएमटी -करमाळी साप्ताहिक स्पेशल १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत धावणार आहे. लो. टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक स्पेशलही १० एप्रिल ते ५ जूनदरम्यान धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवअनंतपुरम साप्ताहिक स्पेशल ३ एप्रिल ते २९ मे दरम्यान धावणार आहे. या तीनही उन्हाळी स्पेशल गाड्यांमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.