तीन अल्पवयीन मुली आरोपी महिलेसह ताब्यात

रत्नागिरी:- मौजे अंजनवेल ता. गुहागर येथुन बेपत्ता तीन अल्पवयीन मुलींना १२ तासात शोधण्यास गुहागर पोलीसांना यश आले आहे. मुबंई येथुन घेतले सुखरुप ताब्यात घेतले आहे.                                  

 ५ ऑगस्ट रोजी गुहागर तालुक्यातील अरमारकर मोहल्ला, अंजनवेल येथील राहणारी गजाला फैयाज महालदार यांच्या ३ अल्पवयीन मुली यांना मोहल्यात राहणा-या अफिया सुलतान अन्सारी व अरविना सुफियार पांजरी या महिलांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास, आम्हाला अजंनवेल येथील डॉक्टरांकडे जायचे असल्याचे सांगुन मुलींना सोबत घेवुन गेल्या. मात्र तिनही अल्पवयीन मुली परत न आल्याने मोहल्यात इतरत्र शोध घेतला तसेच डॉक्टरांकडेही चौकशी केली तेव्हा सदर महिला व मुली हॉस्पीटल मध्ये गेल्या नसल्याचे समजले.

गजाला महालदार यांनी रात्री १२ वाजेपर्यंत वाट पाहुन आपल्या अल्पवयीन मुली घरी परत आलेल्या नसल्याने व सदर दोन्ही महिलांशी संपर्क बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यावेळी ३ मुलींसोबत असलेल्या दोन्ही महिलांची स्वतःची मुले सुध्दा त्यांचे समवेत असल्याचे समजले. सदर माहिती गुहागर पोलीसांना प्राप्त होताच सदर घटनेत एकुण ७ बालक व २ महिला बेपत्ता असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आल्याने मा.पोलीस अधीक्षक डॉ . मोहितकुमार गर्ग रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागिय पोलीस अधिकारी सो चिपळुण यांचे पथक तपास कामासाठी पाठवण्यात आले.

 महिला या सर्व बालकासहित मुबंईच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याने त्या प्रमाणे वेळ न घालवता पोउनि कांबळे यांचे पथकाला तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते. इतर पथकाने केलेल्या तपासामध्ये सदरच्या महिला व ७ बालके हे मुंबईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्नं झाले . घटनाक्रम व वेळेची सांगड घालत गुहागर पोलीसांनी सदर दोन्ही महिला व ७ बालके यांना दादर येथुन सुखरुपरित्या ताब्यात घेतले आहे.