खेड:- खेड तालुक्यातील तिसंगी कातकरवाडी येथे एका १९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अतुल लक्ष्मण निकम (वय १९, रा. तिसंगी, कातकरवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतुल निकम याने शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. खेड पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद आमृ. क्रमांक १०३/२०२५, बी. एन. एस. एस. १९४ प्रमाणे करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.