तारकर्लीचे स्कुबा डायव्हर घेणार नौकेचा शोध 

रत्नागिरी:- समुद्राच्या तळाशी रूतलेल्या जयगड येथील नावेद २ नौकेचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाकडून तारकर्ली येथील स्कुबा डायव्हरची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दिली आहे.      

येत्या काही दिवसांत ही मदत घेऊन दोन मैलांवर ही नौका जिथे रूतली आहे त्या भागाची संपूर्णपणे स्कुबा डायव्हरांमार्फत पाहणी केली जाईल. तिथे काय आहे याची खात्री करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांनी सांगितले. ज्या नावेद -२ नौकेला फतेहगड जहाजाने धडक दिली आहे ते फतेहगड जहाज येत्या १५ डिसेंबरपर्यंत जयगड बंदरात बोलावावे , अशी नोटीस पोलीस विभागाकडून देण्यात आल्याची माहिती सदाशिव वाघमारे यांनी दिली आहे.