…तर 14 ऑक्टोबर पासून बेमुदत बंद

पोस्टल एम्प्लॉईज युनियनचा इशारा; रत्नागिरीत निदर्शने

रत्नागिरी:- रत्नागिरीतील ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे गुरूवारी येथील मुख्य डाक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने व काळ्या फित लावून काम सुरू केले आहे. मागण्यांची पूर्तता होत नसल्याने येत्या 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचीही हाक दिली आहे.     

संघटनेने ठेवलेल्या मागण्यासाठी गोवा सर्पलमध्ये’ सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन आंदोलनात्मक कार्यक्रम व बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार वरिष्ठ संघटनेच्या आदेशानूसार रत्नागिरी विभागामध्येही हा आंदोलनात्मक कार्यक्रम व बेमुदत संप’ सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करुन राबविले जात आहेत. हा आंदोलनात्मक कार्यक्रम व संपाच्या प्रमुख मागण्या या युनियनने डाक विभागासमोर ठेवल्या आहेत.  

त्या प्रमुख मागण्यांमध्ये दिल्ली सर्पल प्रमाणे वितरण विभागात सम व विषम पध्दतीने कामाचा फॉर्म्युला ठरवावा वा त्वरित रोस्टर ड्युटी चालू करावी. सन 2015-16, सन 2016-17 व सन 2017-18 या कालावधीतील ओपन मार्केट  कोट्यातील सर्व रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. सुकन्या समृद्धी खाते खोलण्यासाठी घेण्यात येणारे मेळे, आय.पी.पी.बी चे खाते व ए.ई.पी.एस ई. साठी टारगेट च्या नावावर कामगारां वर केली जाणारी सक्ती त्वरित बंद करावी.  लॉकडाऊन काळातील गैर हजेरीचा कालावधी हा वर्प फॉम होम असा गृहीत धरावा कामगारांच्या वैयक्तिक सुट्टी घेऊ नये. पोस्टमन व एम.टी.एस कॅडर च्या अंडर रुल 38 अंतर्गत ट्रान्सफर च्या ऑर्डर त्वरित प्रसिद्ध कराव्यात. आऊट सायडर पोस्टल एजंट योजना ( ओपीए स्कीम ) त्वरित बंद करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.  त्यासाठी बेमुदत संपाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यकमातील एक भाग म्हणून 8 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून रत्नागिरी मुख्य डाक कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी संघटनेचे दिपक भितळे, किरण विचारे, पकाश मापणकर, पांडुरंग आंबेलकर, पकाश पाडाळकर, सुनिल पावसकर, आदी कर्मचारी सहभागी झाले होते. 9 ऑक्टोबर 2020 रोजी काळ्या फिती लावून निषेध व सायंकाळी आपआपल्या कार्यालय समोर सोशल डीस्टन्स चे पालन करत  मूक निदर्शने केली जाणार आहेत. 13 ऑक्टोबर रोजी रिजन व सर्पल कार्यालयासमोर मूक निदर्शने केली जाणार आहेत. तर 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:00 वाजता पासून कार्यालयात हजर राहत हजेरी बुक वर स्वाक्षरी करून बैठया पद्धतीने बेमुदत संप केला जाणार आहेत.