पालवणी चेकपोस्ट जवळील घटना
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी चेकपोस्ट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐश्वर्या किसन पवार असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळची कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील असलेली आणि सध्या पालवणी फाटा (मंडणगड) येथे राहणारी ऐश्वर्या किसन पवार (वय १८ वर्षे) ही १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलच्या जवळ असलेल्या एका काजूच्या झाडाला तिने आपल्या ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. १८ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०० वाजता या प्रकरणाची पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्य क्र. ०२/२०२६ नोंद करण्यात आली आहे.
एवढ्या कमी वयात ऐश्वर्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांकडे चौकशी सुरू आहे.









