तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत कारचालकावर गुन्हा

खेड:- खेड-आंबवली मार्गावरील खालची हुंबरीनजीकच्या वळणावर दुचाकीला धडक देत दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी इर्टिगा कारचालक स्वप्निल अनिल लाड. (२८ रा. तळे-सात्विकवाडी) याच्यावर मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात ९ मार्च रोजी घडला होता.

या अपघातात संकेत प्रदीप कदम (३०, रा. हुंबरी, खेड) या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. तो दुचाकीवरून (एम.एच. ०८ ए.एक्स. ६०२४) जात असताना समोरुन येणाऱ्या इर्टिगा कारचालकाने (एम.एच. १२ डी.के. ६२२९) रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक देवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या बाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय इदाते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.