तणनाशक प्राशन केलेल्या वेळवण येथील तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- तणनाशक विषारी औषध पिलेल्या तरुणीला उलट्या झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी ॲस्टर आधार रुग्णालय, कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. प्रणाली प्रकाश गार्डी (वय २६, रा. वेळवण, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

दीपाली देवेंद्र घाटकर (वय २९, रा. कुवारबाव-रत्नागिरी) यांची बहीण मयत प्रणाली गार्डी तिच्या आईसह प्रणालीच्या लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी शनिवारी कुवारबाव येथे राहावयास आल्या होत्या. शुक्रवारी (ता. १८) सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रणाली हिने तणनाशक प्यायले. तिला उलट्या होऊ लागल्या. तत्काळ नातेवाइकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापुरातील ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.