रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्यावतीने दिनांक ३० व ३१ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर ॲथलेटीक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा डेरवण क्रीडा संकुलं येथे होणार आहेत. या स्पर्धेतून राज्य स्पर्धेकरिता जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धा १४, १६, १८ आणि २० वर्षाखालील मुले व मुली या गटासाठी होणार आहेत. खेळाडूंनी आपल्या वयोगट सहभागी होणे बंधनकारक आहे. १२ वर्षाखालील खेळाडूना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. सर्व खेळाडूंनी दि. २८ जुलैपूर्वी आँन लाईन भरणे आवश्यक आहे. स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धेपूर्वी दोन दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल.
वयोगट- १४ वर्षाखालील– १६-११-२००८ आणि १५-११-२०१० दरम्यान जन्मलेले. १६ वर्षाखालील-१६-११-२००६ आणि १५-११-२००८ दरम्यान जन्मलेले. १८ वर्षाखालील– जन्म १६-११-२००४ आणि १५-११-२००६ दरम्यान जन्मलेले. २० वर्षाखालील– १-११-२००२ आणि १५-११-२००४ दरम्यान जन्मलेले.
१५ नोव्हेंबर २०२२ रोजी १२ वर्षाखालील खेळाडू सहभागी होण्यास पात्र असणार नाहीत. खेळाडूंनी सोबत येताना वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, १०, १२ वीचे बोर्ड प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संदीप तावडे, सचिव रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशन यांच्याशी संपर्क साधावा.









