रत्नागिरी:- ताप, पोटदुखीने त्रस्त असलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुनिल देवू गौतडे (वय ५२, रा. डफळचोळवाडी-खेडशी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २९) दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सुनिल गवतडे हे गेली दहा वर्षापासून डायबेटिज चा आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पाच दिवसापासून त्यांना उलट्या, जुलाब, ताप व पोटात दुखू लागले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात अतीदक्षाता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.