ट्रिपल सीट घेऊन जाणार्‍या दुचाकीला अपघात, तिघेही जखमी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील कशेळी ते नाटे सागरी महामार्गावरुन दुचाकीने ट्रिपल सीट घेऊन जात असताना आडिवरे येथील वळणावर गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना सोमवार 6 जून रोजी सायं. 6.30 वा. च्या सुमारास घडली. 

राजेंद्र दशरथ गिजम (27), रोशन दिवाकर दळवी (21), श्रेयस शैलेश बाणे (22, तिन्ही रा. नाटे भराडीनवाडी, राजापूर) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संजय झगडे यांनी नाटे पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार दुचाकीचालक राजेंद्र गिजम याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184, 128 (1), 194 (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.