टेम्पो-रिक्षाचा जे के फाईल येथे भीषण अपघात; महिला गंभीर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहारानजीकच्या जे.के फाईल्स येथे टेम्पो आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात एक महिला प्रवासी गंभीररित्या जखमी झाली आहे. 

शुक्रवारी पहाटे या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. यातील रिक्षा ही हातखंबा येथे जात असल्याचे समजते. मासे विक्रेती महिला या रिक्षातून प्रवास करत होती. यावेळी रत्नागिरीकडे येणाऱ्या टेम्पोची आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. रिक्षेतील दोघा जखमींना शासकीय रुग्णालयात केेेलं दाखल करण्यात आले आहे.