लांजा:- टेम्पो आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना लांजा साटवली मार्गावर लांजा शहरात महिलाश्रमजवळ मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजित सुरेश कवचे (राहणार रावारी भोसलेवाडी) हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल (होंडा यूनिकॉर्न क्रमांक एम एच ०४ जीएस ३४५९) हे घेऊन मंगळवारी रावारी येथून लांजा कडे येत होते. यावेळी त्यांच्या मोटरसायकलवर अरुण रामचंद्र कवचे हे देखील होते.
याच दरम्यान राघवेंद्र सिंग (नालासोपारा, वसई) हा आपल्या ताब्यातीलटाटा ४०७ टेम्पो (क्रमांक एम.एच.०४ एस-४४९४) घेऊन महिला आश्रमकडून लांजा साटवली मुख्य रस्त्यावर बाजारपेठ येथे येत असतानाच सायंकाळी ६.३० वाजता मोटारसायकल वेगाने येऊन टेम्पोच्या मागील बाजूस उजव्या टायरवर धडक दिली. त्यानंतर हा मोटर सायकलस्वार हा रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडे झुडपात जाऊन फेकला गेला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजता झाला.