टॅन्कर मधील प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत; टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ते निवळी टॅन्कर अपघातातील संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अखतर लियाकत खान (वय ३३, रा. राघोगड इंदीरा गल्ली, ता. राघोगड जि. गुंजा, मध्यप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १७ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास निवळी रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित टॅन्कर (क्र. एनएल -०१ एन ४६३७) मध्ये जयगड येथे एस. पी. जील गॅस टॅंकर मध्ये भरुन हैद्राबादकडे निघाला होता. त्यामध्ये कंपनीचा चालक भाऊसिंग वासेकेला, अनिल प्रजापती, रामेश्वर रामभरोसा सैनी यांना गाडीत बसवून निवळी येथे सोडण्याकरीता जात असताना टॅन्कर निष्काळजीपणे चालवून अपघात केला. स्वतःच्या व कंपनीच्या चालकाच्या दुखापतीस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.