टीआरपी येथे दुचाकीची दोन महिलांना धडक

रत्नागिरी;-बेदरकारपणे दुचाकी चालवून दोन पादचारी महिलांना धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना शुक्रवार 8 एप्रिल रोजी रात्री 11 वा. टीआरपी कृषी बाजार समितीकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली.

याबाबत राणी पर्शुराम रेवडेकर (42, रा.रसाळवाडी शांतीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,शुक्रवारी रात्री राणी रेवडेकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या सुविधा यादव या दोघी हॉटेलमधील आपले काम आवरुन घरी जात होत्या.त्या टीआरपी कृषी बाजार समतीकडे जाणारा रस्त्या क्रॉस करत असताना जे.के.फाईल्सकडून येणार्‍या अज्ञात दुचाकि चालकाने या दोघींनाही धडक दिली.धडक दिल्यानंतर चालकाने घटनस्थळावरुन पळ काढला असून या अपघातात या दोघींनाही दुखापत झाली आहे.