टिआरपी येथे दोन दुचाकीची धडक ; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील टीआरपी रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले. संशयित दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तीयाज अब्दुलसत्तार पटेल (वय ६५, रा. अंगण प्लाझा, मारुती मंदिर नाचणे रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (२) रात्री दहाच्या सुमारास टिआरपी येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित पटेल यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ ए.एम. ९६००) ही डीमार्ट टीआरपी रत्नागिरी ते मारुती मंदिर असा येत असताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून टिआरपी येथील रस्त्यावर दुचाकी (क्र. एमएच-०८ बी.ए २४०३ ) हिला ठोकर दिली. या अपघातात नुपूर दिनेश जैन (वय ३५, रा. उत्कर्ष नगर कुवारबाव,रत्नागिरी) व स्वतः दुचाकी स्वार हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.