झाडावरून पडून जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड:- खेड तालुक्यातील नातुगर गावडेवाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रामकृष्ण काशिराम गावडे असे त्यांचे नाव आहे.

रामकृष्ण गावडे हे १० फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या राहत्या गावी झाडावर चढून फांद्या तोडत होते. यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते दुसऱ्या झाडावर पडले. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. केईएम रुग्णालयातील वॉर्ड २० ए मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.