रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हारेकरवाडी येथे शेतीसाठी कवल तोडत असताना झाडावरुन पडून गंभिर दुखापत झालेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना सोमवार 8 डिसेंबर रोजी रात्री 9.45 वा.सुमारास घडली.
तानू झिंगू बामणे (72,रा.तुरळ हारेकरवाडी,संगमेश्वर) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सोमवार 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास ते शेवनीच्या झाडावर चढून शेतीसाठी कवल तोडत होते. त्यावेळी अचानकपणे तोल गेल्याने ते झाडावरुन खाली पडल्याने त्यांना गंभिर दुखापत झाली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्राथमिक उपचारांसाठी आरोग्य केंद्र कडवई येथे नेउन अधिक उपचारांसाठी वालावलकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना रात्री 9.45 वा.सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









