झाडगाव मध्ये पाच तर तालुक्यात एकूण 31 नवे पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 31 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

रत्नागिरी शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नसला तरी शहर आणि परिसरात वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
 

शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार गोळप येथे 3 रुग्ण सापडले आहेत. झाडगाव येथे 4, नूतननगर 1, पावस धनगर वाडी 1, माळनाका 2, मारुती मंदिर 1, मारुती आळी 1, लांजेकर कम्पाउंड 1, संगमेश्वर 1, खालची आळी 1, गोडाऊन  स्टॉप 1, देवरुख 1, मालगुंड 1, झाडगाव शेरेनाका 1, शंखेश्वर पार्क 1, करबुडे 1, नाचणे 3, रेल्वे कॉलनी 1, शिरगाव 1, चिपळूण, पोलीस क्वार्टर्स 1 आणि गावखडी येथे एक रुग्ण सापडला आहे.